HomeनांदेडRepublic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात...

Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

हिमायतनगर, अनिल मादसवार| भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी हिमायतनगर जिल्हा नगरपंचायत कार्यालयात ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख मेहबूब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नगराध्यक्ष शेख रफिक यांनी सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद कन्या शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

IMG20260126084029 01 Republic Day celebrated : हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

लेझिम सादरीकरणाने वेधले लक्ष
ध्वजारोहण कार्यक्रमात जिल्हा परिषद कन्या शाळेच्या  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सादर केलेल्या लेझिम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध व उत्साही सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments