लोहा l लोह्याच्या जनतेनी इतिहास घडविला. आमदार प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरीपुत्र शरद पवार यांच्या हाती शहराचा कारभार दिला.सत्कार.. सोहळे बाजूला सारून शरद पाटील आता भल्या सकाळीच लोकांच्या दारी उभे आहेत .ते मतदान काळात दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी..स्वच्छता दिवाबत्ती व पाणी यास प्राधान्य देत शहराच्या वेगवेगळ्या भागात स्वतः नगराध्यक्ष जाऊन पाहणी करताहेत .ही सुरुवात उत्साहवर्धक असून त्यात सातत्य राहिले तर निश्चितच नगराध्यक्ष याचाच नावलौकिक वाढणार आहे


लोहा शहरात मागील सतेच्या काळात माजी नगराध्यक्ष यानी शहराचा बट्ट्याबोळ केला. भाजपाचा जनतेनी सुपदासाप केला.एक कमळ फुलले तेही मुस्लिम प्रभागात अशी अत्यंत दुरावस्था झाली.जुन्या शहरा पासून ते कंधारच्या किल्ल्या पर्यंत कुठेच “कमळ ” फुललेले दिसणार नाही (अपवाद हबीब नबीसाब) एवढी वाईट परिस्थिती या पक्षावर ओढवली आहे. तर दुसरीकडे शरद पाटील यांचा राजकारणाचा गेम भाजपाच्या माजी नगराध्यक्ष व त्याच्या स्तुतीपाठकांनी केला त्या सर्वांचा प्रतापरावांच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांनी सर्वानाच नगर पालिकेतूनच हद्दपार केले .


पद्ग्रहण सोहळा पार पडला त्या दिवसापासून नगराध्यक्ष शरद पवार आपल्या कामाला लागले.ते


गर्विष्ठ नाहीत .त्यांना कोणीही हाक द्या त्याच्याकडे धावून जाणार, काम करणार . मदत करणार असा त्याचा स्वभाव .त्यामुळे शहरात भल्या सकाळ पासूनच नगराध्यक्ष गल्लोगल्ली फिरताहेत लोकांचया ग्राऱ्हाणी समस्या जाणून घेताहेत .दारांत उभे राहून नावासह लोकांना बोलताहेत त्यामुळे आपल्याला “हक्काचा माणूस” लाभला.आ चिखलीकर यांनी केलेली निवड सार्थ आहे असे जनतेला वाटते आहे.स्वच्छता दिवाबत्ती तसेच पाणी याबाबत त्या त्या भागातील रहिवाशांच्या सूचना ऐकून त्यांनी अंमलबजावणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार करत आहे

लवकरच सर्व शहर स्वच्छ करू शहरातील जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे आ चिखलीकर साहेबाच्या शब्दावर लोकांनी विश्वास ठेवला व माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यास या शहराचा प्रथम नागरिक केले या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आमचे मार्गदर्शक प्रवीण पाटील।चिखलीकर , सचिन पाटील, .सर्व नगरसेवक तसेच प्रमुख कार्यकर्ते याच्या मार्गदर्श नावाखाली शहरासाठी चांगले काम करू असा विश्वास नगराध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला

