नांदेड (प्रतिनिधी) नांदेड जिल्हा आरोग्य विभागातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांची बैठक राज्याध्यक्ष विजय बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला लातूर विभागीय अध्यक्ष प्रकाश सानप, सचिव अभिमन्यू सुर्वसे व इतर मान्यवर हजर होते.


संघटनेच्या बैठकीत अत्यंत साधेपणात पार पडलेली असून जिल्हातून सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याचे या बैठकी मध्ये दिसून आले. आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजातील समस्या, विविध प्रश्न व अडी अडचणीबाबत आपले विचार मांडले. गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती व त्यातील टप्पे कमी करणे, आश्वासित प्रगती योजना व इतर काही प्रश्नावर सर्वांचे विचार मंथन झाले. यामध्ये श्रीमती राठोड,भंगारे, दरगू , पानपट्टे, मलदोडे यांनी आपले विचार मांडले.

संघटनेचे विभागीय अध्यक्ष सानप यांनी सर्वांसोबत सुसंवाद साधून संघटनेने राज्यपातळीवर प्रशासनातील प्रश्नावर विविध कामे केलेली असल्याचे सांगून कुठली ही प्रसिद्धी न करता आपल्या सर्व कर्मचारी बंधू साठी काम केल्याचे, प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडल्याचे सांगीतले. कायम आपण सकारात्मक कामकाज करत राहिले की, त्याचे परिणाम नक्कीच चांगले दिसून येतात. एकमेकात चांगला सुसंवाद साधल्यामुळे एकमेकातील जे काही गैरसमज झालेले आहेत तेही निघून जातात. सध्या तंत्रयुगाच्या काळात कामाच्या स्वरूपात मोठा बदल झाल्याचे यावेळी प्रकाश सानप यांनी सांगितले.



या बैठकीमध्ये सर्व सर्वानुमते नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येऊन त्यामध्ये जिल्हाध्यक्ष -विजय चव्हाण, उपाध्यक्ष -संतोष दरगू, सचिव-सचिन पानपट्टे ,कोषाध्यक्ष :अविनाश मलदोडे, संघटक: शाम सावंत, महिला संघटक : मिनू राठोड यांची निवड करण्यात आली. योगेश मुदीराज यांनी कार्यकारिणी प्रस्ताव सादर केल्यानंतर सर्वानमुते सर्व पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये मुंबई येथून संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बोरसे यांनी व्हिडीओ काॅलद्वारे सुसंवाद साधला.


पुढील भविष्यात येणाऱ्या आठव्या वेतन आयोगात ग्रेड पे वाढीचा मुद्दा प्रकर्षाने सर्वांनी मांडला तसेच पदोन्नतीचे टप्पे कमी करण्याकरिता चर्चा करण्यात आली. एन.एच.एम. संयोजनात आपल्या कॅडर वर कुठेही अन्याय होवू नये याकरिता सर्वांनी लढा उभारण्याची तयारी दर्शविलेली आहे. तसेच वित्त विभागाचे लेखाधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी पदे आपल्यावर थोपवण्यात येणार आहेत याकरिता राज्याध्यक्ष यांनी वेळ प्रसंगी लढा देण्याकरिता सर्वांनी तयार राहण्याच्या सूचनाही दिल्या.
नांदेडचे संघटन योगेश मुदिराज यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले वैचारिक व मजबूत, प्रेमळपणे असल्याचे गौरवोद्गार काढले. पंडित सिनकर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी जैरमोड,कल्याणकर, जाडे, श्रीमती भंगाळे, श्रीमती धिरडीकर, मामीलवाड, गोपिनवार, हरनाळीकर, पिंपळे,घोडगे,मगर,तांबोळी,राठोड, दुधेवाड, धुरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

