हिमायतनगर| सरसम (ता. हिमायतनगर) येथील विवेकानंद ग्यानोबा ढेमकेवाड (वय ३५) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले.


विवेकानंद ढेमकेवाड हे देगलूर येथील वनविभाग कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, दि. २९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या मूळ गावी सरसम बु., ता. हिमायतनगर येथे म्हसोबा नाल्याजवळील शेतात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ व भावजयी असा मोठा परिवार आहे.


ते अर्धापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चित्तरंजन ढेमकेवाड यांचे मोठे बंधू असून, पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवाड व देवानंद शिवण्णा मंडलवाड यांचे भाचे होत.


