नांदेड l महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर आणि सीमावर्ती भागातील चळवळीचे प्रमुख समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांच्यात झालेल्या चर्चा डी .डी.होलकर यांनी अलगदपणे टिपली. संक्षिप्त पण धीर गंभीर चर्चेने मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर यासह अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या अचानक भेटीत आगामी निवडणुकीचे विश्लेषण तसेच सीमावर्ती भागातील काही प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.


“आमदार नांदेडचे, धीर गंभीर चर्चा बिलोलीची” अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून, या अनौपचारिक भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काहींनी मोबाईल मध्ये टिपले. सोशल मीडियावर प्रसारित केले.

सीमावर्ती भागातील विकास, प्रशासनाशी संबंधित सामान्य लोकांच्या अडचणी, तसेच स्थानिक जनतेच्या प्रश्नांबाबत दोघांमध्ये संक्षिप्त संवाद झाल्याचे सांगितले जात आहे.


महाराष्ट्र वाहन सेवा संरक्षण कृती समितीचे राज्यस्तरीय अध्यक्ष तथा बिलोली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अॅड. धोंडीबाराव पवार यांच्या निवासस्थानी आणि पवार कुटुंबीयांच्या निमंत्रणावरून मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी स्नेहभोजन कार्यक्रमाचे नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आमदार बालाजी कल्याणकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांच्यातील ही चर्चा धीर गंभीर झाली.या वेळी महाराष्ट्र वाहन सेवा संरक्षण कृती समिती कार्याध्यक्ष डॉ. शिवदास हमंद, वैश्य समाजाचे जिल्हा स्तरावरील पदाधिकारी श्री राजेश्वर गंदेवार, वैद्यकीय क्षेत्रातील श्री तुम्मोड, शिक्षक संघटनेचे श्री संजय कोठाळे,डी. डी. होलकर माजी नगराध्यक्ष सुभाष पवार आणि कृषी अधिकारी ज्योतिबा पवार यांच्या मित्रवर्याचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
तसेच धोंडीबाराव पवार यांच्या निमंत्रणावरून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. सदर भेट आणि त्यातून झालेली चर्चा आगामी काळातील कोणत्या सामाजिक घडामोडींना दिशा देणारी ठरेल, ?अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. याबाबत आमदार कल्याणकर म्हणाले की निवडणुकीचे विश्लेषण जाणून घेत होतो. तर मुंडकर म्हणाले की, सीमावर्ती प्रश्न आणि विश्लेषण यावर चर्चा झाली.

