MLA Nanded and (serious) discussion Biloli : आमदार नांदेडचे अन् (गंभीर) चर्चा बिलोलीची
नांदेड l महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर आणि सीमावर्ती भागातील चळवळीचे प्रमुख समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते गोविंद मुंडकर यांच्यात झालेल्या चर्चा डी .डी.होलकर यांनी अलगदपणे टिपली. संक्षिप्त पण धीर गंभीर चर्चेने मोठ्या संख्येने उपस्थित मान्यवर यासह अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या अचानक भेटीत आगामी निवडणुकीचे विश्लेषण तसेच सीमावर्ती भागातील काही प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
“आमदार नांदेडचे, धीर गंभीर चर्चा बिलोलीची” अशी जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरू असून, या अनौपचारिक भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. काहींनी मोबाईल मध्ये टिपले. सोशल मीडियावर प्रसारित केले.
सीमावर्ती भागातील विकास, प्रशासनाशी संबंधित सामान्य लोकांच्या अडचणी, तसेच स्थानिक जनतेच्या प्रश्नांबाबत दोघांमध्ये संक्षिप्त संवाद झाल्याचे सांगितले...
