हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आपली रणनीती अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर नगरपंचायतीतील सर्व 17 नगरसेवक जागा तसेच एक नगराध्यक्ष पद बसपा उमेदवार लढविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धम्मपाल मनेश्वर यांनी दिली.


या संदर्भातील महत्वाची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली असून अधिकाधिक इच्छुक, अभ्यासू कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत बसपा मजबूत पायाभरणी करणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीमुळे मिळत आहेत.


नांदेड जिल्हा बसपा निवडणूक नियंत्रण समन्वय समिती जाहीर


मुंबई येथे बसपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खा. राजारामजी (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हानिहाय निवडणूक समन्वय समित्या घोषित करण्यात आल्या.


नांदेड जिल्ह्यासाठी घोषित करण्यात आलेल्या बसपा निवडणूक नियंत्रण समन्वय समितीमध्ये खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यात मनीषभाऊ कावळे यांच नावं अग्रस्थानी असून, दिगंबर मोरे, मिलिंद बनसोडे, साहेबराव डाकोरे, सुधाकर सरोदे, सुभाष भोकरे, सकाराम ईगोले, चंद्रप्रकाश देगलूरकर, सटवाजी सोनकांबळे, राजकीय घडामोडींना वेग येत असताना हिमायतनगरमध्ये बसपाचे उमेदवार सर्व जागांवर उतरविणार असल्यामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली आहे.


