Friday, June 26

Tag: Nagar Panchayat elections

Kha. Ashokrao Chavan : नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणित विजय : खा. अशोकराव चव्हाण

Kha. Ashokrao Chavan : नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणित विजय : खा. अशोकराव चव्हाण

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड | नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेला दणदणित विजय म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर दाखवलेला ठाम विश्वास असल्याचे प्रतिपादन खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. विकसित भारत व विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पनेला मतदारांनी कौल दिला असून, भाजपच्या विकासकामांच्या धडाक्याला मिळालेला हा अनुकूल प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी हा निर्विवादपणे क्रमांक एकचा राजकीय पक्ष ठरला आहे. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले असून, भाजपचे अधिकृत तीन नगराध्यक्ष निवडून आले आहेत. त्याचबरोबर सहयोगी नगराध्यक्षांच्या रूपाने भाजपच्या यशात अधिक भर पडली आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपचे अधिकृत ७४ नगरस...
Bsp Meeting : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत बसपाचा दमदार प्रवेश होणार

Bsp Meeting : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत बसपाचा दमदार प्रवेश होणार

नांदेड, राजकीय
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी (बसपा) ने आपली रणनीती अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास सुरुवात केली आहे. हिमायतनगर नगरपंचायतीतील सर्व 17 नगरसेवक जागा तसेच एक नगराध्यक्ष पद बसपा उमेदवार लढविणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धम्मपाल मनेश्वर यांनी दिली. या संदर्भातील महत्वाची बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली असून अधिकाधिक इच्छुक, अभ्यासू कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी निवडणुकीत बसपा मजबूत पायाभरणी करणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीमुळे मिळत आहेत. नांदेड जिल्हा बसपा निवडणूक नियंत्रण समन्वय समिती जाहीर मुंबई येथे बसपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत खा. राजारामजी (महाराष्ट्र प्रदेश प्रभारी) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील नगरपरिषद व न...
error: Content is protected !!