हदगाव, गौतम वाठोरे l तालुक्यातील सर्वात टोकाचे समजल्या जाणाऱ्या मरडगा येथील ग्रामपंचायत वर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या जागेवर सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांचे बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली सविस्तर वृत्त असे की मरडागा ग्रामपंचायतीवर महिला ओबीसी राखीव असलेल्या अनुसयाबाई बापूराव जाधव हे सरपंच पदावर कार्यरत होत्या परंतु दोन महिन्यापूर्वी त्यांचा हृदयविकारांच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाले असल्याने सदरील सरपंच पदाची जागा रिक्त होती.


त्यामुळे त्याजागी वार्ड क्रमांक तीन मधील वंचित बहुजन आघाडीच्या सौ. संगीताबाई सुंदर राठोड यांची सरपंच पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली व मरडगा ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकविला आहे यावेळी मंडळ अधिकारी महाळनर मॅडम,तलाठी नरवाडे ग्रामसेवक कराळे. उपसरपंच गजानन नरवाडे, रणजित बगाटे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायत च्या सर्व सदस्यांनी व गावातील नागरिकांनी नवनिर्वाचित सरपंच संगीताबाई सुंदर राठोड यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या


