Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

IMG 20251103 WA0002 Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

हदगांव, गौतम वाठोरे| हदगाव तालुक्याचे दैवत असलेल्या श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथील प्रसिद्ध मंदिरात श्री श्री १००८ महंत श्रीगोपाळगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली दत्त मूर्तीचा जिर्णोद्धार सोहळा ५ नोव्हेंबर रोजी होणार असून त्यानिमित्त आज दिनांक २९ ऑक्टोबर रोजी बुधवारपासून दत्तनाम सप्ताहाला सुरुवात झाली आहे.

हदगाव शहरालगत निसर्गरम्य वातावरणामध्ये दत्तबर्डीच्या टेकडीवर श्री दत्तात्रयाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला शेकडो वर्षाची परंपरा आहे. दत्तात्रयांचे हे मोठे घर म्हणून ओळखले जाते. या मंदिरात अनेक वर्षांपूर्वी बनवलेली मूर्ती आहे या मूर्तीला बदलण्याची गरज असल्याचे सर्व भक्त गणांच्या आणि खुद्द श्री श्री १००८ महंत महाराजांच्या लक्षात आले. त्यासाठी दत्त भक्तांची बैठक घेऊन सर्वांच्या सहयोगाने महंत श्रीगोपाळगिरी महाराजांनी ४१ किलो चांदीची मूर्ती बसवण्याचा संकल्प केला.

त्यासाठी सर्व दत्त भक्तांनी सढळ हस्ताने देणगी सुद्धा दिली. एक दत्त भक्त श्री सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी मूर्तीसाठी मोलाचा हातभार लावला. दत्त भक्तांनी गावागावातून वर्गणी करून या मूर्तीसाठी देणगी दिली, तर काही दत्तभक्तांनी पाच हजार, अकरा हजार, एकेविस हजार ते एक लाख, सव्वा लाख रुपये पर्यंत देणगी दिली. सर्व दत्त भक्तांच्या देणगीतून ही ४१ किलो चांदीची मूर्ती बनवण्यात आली असून जुन्या मुर्तीच्या ठिकाणी तिची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा येत्या ०५ नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात येणार आहे.

या दत्त मूर्तीच्या जिर्णोद्धार कार्यक्रमानिमित्त दि. २९ ऑक्टोबर रोजी बुधवार पासून दत्त नाम सप्ताहास सुरुवात करण्यात येत आहे. आज बुधवारपासूनच हदगांव शहराजवळ दत्तबर्डी संस्थान येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. यामध्ये दुरवरून येणारे दत्तभक्त या सप्ताह निमित्त सात दिवस हदगावांत दत्तभक्तीत लिन होतांना दिसतील. या सप्ताह निमित्त येणाऱ्या दत्त भक्तांच्या राहण्याची व महाप्रसाद रुपाने भोजनाची सर्व व्यवस्था सातही दिवस हदगांव परिसरातील वेगवेगळ्या गावच्या भक्तमंडळी कडून करण्यात येणार आहे.

IMG 20251103 WA0000 Restoration of Datta idol : श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी येथे दत्त मूर्तीचा जीर्णोद्धार : ४१ किलो चांदीच्या दत्त मूर्तीची स्थापना ५ नोव्हेंबर रोजी होणार

तर दि. ०४ नोव्हेंबर रोजी या मुर्तीची शाही मिरवणूक शिवपार्वती मंगल कार्यालयापासून ११ वाजता निघून पाच वाजता श्रीदत्त मंदिर दत्तबर्डी येथे पोहचणार असून या दिवशी हडसणी येथील गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. मुर्ती स्थापनेच्या दिवशी श्री सुभाष शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे चेअरमन सुभाषराव लालासाहेब देशमुख रा. ढोकी ता. जिल्हा धाराशिव आणि कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या सप्ताहाच्या निमित्ताने हदगाव नगरी मात्र भक्तांच्या सहवासाने दुमदुमून जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त हदगाव पोलीसांकडून सर्व प्रकारची दक्षता घेतली जाईल, असे सपोनी संकेत दिघे यांनी सांगितले. दत्तबर्डी संस्थानकडे जाणाऱ्या रोडवर कोणीही अतिक्रमण करू नये, बांधकाम साहित्य ठेवू नये किंवा वाहतुकीला अडथळा होईल असे वाहन उभे करू नये असे आवाहन सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top