भोकर, साईसिंह चौहान| राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड व महाराष्ट्र राज्य क्षत्रिय संघ, राणा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने स्व. देविसिंह कुँवरसिंह चौहान यांच्या स्मृतीत राजपूत क्षत्रिय समाजातील उपवर युवक-युवती राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा (निःशुल्क) पुढील महिन्यात २१डिसेंबर रोजी नांदेड शहरातील कौठा येथील ओम गार्डनमध्ये आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


राजपूत समाजातील विवाहयोग्य मुला,मुलीचे लग्न जमवण्यासाठी नांदेड येथील समाजातील प्रमुख व्यक्तींनी पुढाकार घेत या मेळाव्याचे आयोजन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहयोग्य वधू-वर आणि त्यांचे पालक एकत्र येऊन एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी आणि स्थळांच्या देवाणघेवाणीसाठी हा एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे.या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकांची व्यवस्था आयोजकाकडून करण्यात येणार आहे.त्यासाठी येण्याआधी उपवर युवक-युवती यांच्या परिवाराकडून ९८२३३२६९६८या भ्रमणध्वनीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.


या मेळाव्याची राजपूत समाजातील सर्वांना माहिती व्हावी यासाठी राणा ग्रुपचे अमरसिंह चौहान, मोहनसिंह तौर, रतनसिंह चौहान, किशनसिंह चंदेल, संजयसिंह अवस्थी यांच्यासह इतर सदस्यांनी लगतच्या तेलंगाना, कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी संपर्क साधून या मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.




