हदगांव,गौतम वाठोरे l गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे आदेश धडकताच निवडणूक विभागासह राजकीय पक्ष नेते मंडळी तयारीला लागले आहेत. दिपावली नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पक्षाचे नेतेमंडळी कडुन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.


यामध्ये महायुती बरोबर महाविकास आघाडीमध्येही युती होण्याचे संकेत कमी असल्याने प्रत्येक पक्ष आपली तयारी करीत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक पक्ष योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आपापल्या परीने मतदार संघात सर्वे करून ठरवणार असला तरी दिपावली निमित्त शुभेच्छांचे निमित्ताने मतदार संघात गाठीभेटी घेण्यावर भर देत पक्षातील नेते मंडळी मतदारसंघात पिंजून काढत आहेत.



पळसा मनाठा बामणी फाटा परीसरातील पळसा मनाठा जिल्हा परिषद गटात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कवाना येथे श्रीसंत नंदी महाराज यांचे वंशज असलेल्या बंडु महाराज यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले असल्याने सांत्वन भेटी नंतर त्यांनी बरडशेवाळा भेटीत आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्ते उमेदवार टिकण्यासाठी योग्य उमेदवार ठरवण्यासाठी सर्वे केला जाणार असल्याचे सांगत सर्वे मध्ये जो उमेदवार आग्रह स्थानी असेल त्यांना दिले जात असून जनतेच्या मनातील उमेदवार देणार असल्याचे यावेळेस त्यांनी सांगितले यावेळी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




