Madhavrao Patil Jabalgaonkar ; जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जनतेच्या मनातील उमेदवार देणार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर
हदगांव,गौतम वाठोरे l गेल्या काही वर्षांपासून थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका घेण्याचे आदेश धडकताच निवडणूक विभागासह राजकीय पक्ष नेते मंडळी तयारीला लागले आहेत. दिपावली नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पक्षाचे नेतेमंडळी कडुन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत.
यामध्ये महायुती बरोबर महाविकास आघाडीमध्येही युती होण्याचे संकेत कमी असल्याने प्रत्येक पक्ष आपली तयारी करीत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक पक्ष योग्य उमेदवार ठरवण्यासाठी आपापल्या परीने मतदार संघात सर्वे करून ठरवणार असला तरी दिपावली निमित्त शुभेच्छांचे निमित्ताने मतदार संघात गाठीभेटी घेण्यावर भर देत पक्षातील नेते मंडळी मतदारसंघात पिंजून काढत आहेत.
पळसा मनाठा बामणी फाटा परीसरातील पळसा मनाठा जिल्हा परिषद गटात माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी कव...
