श्रीक्षेत्र माहूरगड l माजी आमदार तसेच माजी सनदी अधिकारी मा. श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य, सुसंस्कृत व कर्तबगार पत्नी ज्येष्ठ समाजसेविका सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे आनंद दत्तधाम आश्रम, श्रीक्षेत्र माहूरगड येथे भेट दिली असता त्यांचा सद्गुरु द भ प राष्ट्रसंत तथा स्वच्छता दूत महाराष्ट्र राज्याचे ब्रँड अँबेसिडर साईनाथ महाराज वसमतकर यांनी सन्मानपूर्वक गौरव केला


नांदेड येथील अनेक महिला भगिनींसह सौ. आशाताई शिंदे या आश्रमाच्या दर्शनासाठी व राष्ट्रसंत महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांच्या आशिर्वादासाठी माहूरगड येथे आगमनास आल्या होत्या. या प्रसंगी महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर व स्वच्छता दूत राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आशाताई शिंदे यांनी साईनाथ महाराजांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.



या कार्यक्रमास किन्हाळकर , गायकवाड , शेटकार , जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. उपस्थित सर्वांनी सौ. आशाताईंच्या समाजकार्यातील योगदानाचे मनःपूर्वक कौतुक करत आश्रमाच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.


सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे या महिलांसाठी प्रेरणास्त्रोत असून, त्यांनी शिक्षण, समाजसेवा, महिला सक्षमीकरण, तसेच सामाजिक ऐक्य या क्षेत्रांत दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि कार्यतत्परतेमुळे समाजात त्यांचा आदर्श निर्माण झाला आहे.

समाजातील अशा संवेदनशील व कर्तबगार व्यक्तींचा गौरव हा समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरतो, हे या सन्मान सोहळ्यात प्रकर्षाने जाणवले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार शेषराव पाटील यांनी मानले. यावेळी पुंडलिक हुंम्बे, पंजाब माने, संतोष मते, अनिल सुरोशे, कलाने, आव्हाड, सोनोने, गजानन मुकाडे यांची उपस्थिती होती.


