श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कै. वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी दुपारी ३ वाजता जाहीर करण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत बालकाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून चार गणांचे आरक्षण निश्चित झाले.


वानोळा – सर्वसाधारण (महिला), हडसणी – अनुसूचित जमाती (महिला), वाई बाजार – सर्वसाधारण गोंडवडसा – इतर मागासवर्गीय (OBC) जिल्हा परिषद गटाचे आरक्षण वाई बाजार गट सर्वसाधारण, वानोळा गट – ओबीसी असें जाहिर झाले आहे. वाई बाजार व वानोळा या दोन्ही गणांमध्ये आरक्षण सर्वसाधारण आणि ओबीसी सुटल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्ष आणि स्थानिक प्रभावी नेत्यांसमोर तगडे उमेदवार उभे करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

आरक्षण बैठकीस पक्षप्रमुख हजर नसले तरी इच्छुकांनी उपस्थित राहून आपली तयारी दाखवली. आरक्षण जाहीर होताच स्थानिक पातळीवर गोटे बसवणे, जातीय समीकरणे साधणे आणि उमेदवारीसाठी पाठपुरावा सुरू झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत पं.स. सभापती पद सर्वसाधारण वाई बाजार व वानोळा गट महत्त्वाचे केंद्रबिंदू असून, येथे काटेरी लढतीची शक्यता होईल असें दिसते.


यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काट्याची लढत अपेक्षित आहे. या आरक्षण सोडतीस सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूलां, तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलाश जेठे, नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम आदी अधिकारी उपस्थित होते. इच्छुक उमेदवार, राजकीय जाणकार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


