नवीन नांदेड l नांदेड तालुक्यातील मार्कंड येथील हनमंतराव येवले व विजय येवले यांच्या शेतातुन जाणारी महावितरण कंपनीच्या तार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी अचानक तुटून जवळपास सात एकर मधील ऊस जळला असुन यात जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले असून घटनास्थळी औद्योगिक वसाहतीचा अग्नीशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली असून महावितरण कंपनीच्या लाईमेनने तात्काळ विघुत पुरवठा बंद केला , घटनास्थळी तलाठी भिसे या भेट देऊन पाहणी केली.अचानक लागलेल्या आगीमुळे अगोदरच संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर संकट कोसळेले असुन तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.


नांदेड तालुक्यातील मार्कड या गावातुन शेतकरी हनमंतराव गयानोबा येवले व विजय शिवाजीराव येवले यांच्ये गट नंबर 109,110,111 मध्ये शेत असुन या शेतीमधुन महावितरण कंपनीच्या विघुत प्रवाह करणारी लाईन गेली असुन 11ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अचानक विघुत प्रवाह करणारी तार शार्टसकिट होऊन पडल्याने लागलेल्या आगीत सात एकर मधील ऊस जळुन खाक झाला ,हि माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली अखेर व मोबाईल वर संपर्क साधुन औद्योगिक वसाहतीतील अग्नीशामक दलाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणली परंतु ऊस जळुन खाक झाला.


घटनास्थळी महावितरणचे लाॅईमेन गुरूनाथ शिंदे यांनी तात्काळ भेट देऊन विघुत प्रवाह बंद केला.या गावाचे तलाठी माधव भिसे यांनी भेट देऊन पंचनामा केला. गावाचे सरपंच आकाश पाटील येवले, तंटामुक्त अध्यक्ष रंगनाथ लामदाडे यांनी पाहणी केली असून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.




