Sunday, June 28

CPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव

नांदेड|  १० ऑक्टोबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. आणि महापालिका आयुक्त यांच्या कक्षास घेराव घालण्यात आला. नांदेड शहरातील पूरग्रस्तांचा छळ थांबणायचे नाव घेत नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

२०२४ मधील पूरग्रस्तांच्या पात्र यादीतील बॅंक खाते क्रमांक चुकल्यामुळे हजारो पूरग्रस्त अनुदाना पासून वंचीत आहेत. ही गंभीर चूक असूनही वरिष्ठ अधिकारी काहीएक बोलण्यास किंवा कार्यवाही करण्यास तयार नाहीत. सीटू कामगार संघटनेने शहरातील पूरग्रस्तांची यादी पत्यासह मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी आदिना देण्यात आली आहे. त्या यादीतील प्रत्येकाच्या घरी जाऊन गृहपाहणी करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावीत. चार दिवसात मागील वर्षाचे अनुदान बाधितांच्या बॅंक खात्यात वर्ग झाले नाही तर एसबीआय डॉक्टर लेन शाखेच्या समोर १४ ऑक्टोबर पासून निदर्शने करून बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्याचा इशारा माकपने लेखी स्वरूपात दिला आहे.

डॉक्टर लेन बॅंक शाखा व्यवस्थापक यांनी आधार कार्ड, बॅंक खाते पुस्तक आणि तहसील मार्फत पाठविलेली यादी पडताळणी करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करावेत ही मागणी देखील आंदोलनात केली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा गंभीर विषय पुढे आला असून योग्य उपाययोजना कराव्यात, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी प्रत्यक्षात जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी भेट द्यावी व तात्काळ भरीव मदत्त कुटुंबियांना करावी या अनुषंगाने देखील मागण्या केल्या आहेत.

सीटू आणि डिवायफआय च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मागील दीड वर्षांपासून साखळी उपोषण सुरुआहे त्या उपोषणातील अपूर्ण मागण्या तातडीने सोडवाव्यात.मौजे वझरा शेख फरीद ता. माहूर येथे मागील ५५ वर्षात नवीन प्लॉट्स पडले नाहीत तेथे सूचित केलेल्या ठिकाणी प्लॉट्स पडावेत आणि मोफत वाटप करून घरकुल बांधण्यासाठी ५ लक्ष रुपये मंजूर करावेत. ह्या मागणी साठी दीड वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर साखळी उपोषण सुरु आहे.

मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी पूरग्रस्तांच्या मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा केली परंतु त्यांचे अधिनिस्त अधिकारी त्यांचे ऐकतील न ऐकतील हा प्रश्न मागण्या पूर्ण झाल्याशिवाय सुटणार नाही अशी प्रतिक्रिया कॉ. गंगाधर गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व माकप सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. उज्वला पडलवार, कॉ. लता गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ.बालाजी पाटील भोसले, कॉ.सचिन वाहूलकर, कॉ.अजिजूर रहेमान आदींनी केले. चार दिवसात गेल्या वर्षीचे अनुदान बॅंक खात्यात वर्ग झाले नाहीतर स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा डॉक्टर लेन येथे आंदोलन करण्याचाइशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!