Homeनांदेडwelcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन...

welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी येथे नवीन प्रवेशित एम.बी.बी.एस. (2025-26) विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘Dean’s Address’ हा स्वागत व मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर भास्करराव देशमुख यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायालय, नांदेडचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल वेदपाठक उपस्थित होते.

कार्यक्रमास डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. शितल राठोड, डॉ. वंदना दुधमल, डॉ. इस्माईल इनामदार, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. हुमेरा खान, डॉ. किशोर राठोड, डॉ. मोहम्मद समीर, डॉ. मारोती डाके, डॉ. मुकुंद कुलकर्णी आदी प्राध्यापक उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश श्री. वेदपाठक म्हणाले की, “भविष्यातील लोकाभिमुख डॉक्टर म्हणून विद्यार्थ्यांनी तन, मन आणि धनाने अभ्यास करावा. सेवा हाच डॉक्टरांचा धर्म आहे,” असे ते म्हणाले.

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक विषयाचे सखोल अध्ययन करून व्याख्यानांना नियमित उपस्थित राहा. शंका त्वरित शिक्षकांकडून दूर करा आणि सहाध्यायींनाही प्रेरित करा.” त्यांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे नियम, कायदेशीर तरतुदी व ॲन्टी-रॅगिंगविषयीही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

medical 1 welcomes newly admitted students : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत

शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वंदना दुधमल यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, “पांढरा कोट हा केवळ पोशाख नसून जबाबदारी व विश्वासाचे प्रतीक आहे. विद्यार्थी म्हणून तो सन्मानपूर्वक परिधान करा.” तसेच त्यांनी अधिष्ठात्यांविषयी बोलताना सांगितले की, “अधिष्ठाता हे संस्थेचे फक्त प्रशासकीय प्रमुख नसून ज्ञान, शिस्त आणि मूल्यांचे प्रतीक आहेत.”

हा कार्यक्रम शरीरक्रियाशास्त्र विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. प्रास्ताविक डॉ. वंदना दुधमल यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. मुजतबा नौशिन व डॉ. भागवत खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी डॉ. मसरत फिरदोस, डॉ. सीमा टाकरस, डॉ. अनुभ्राता मुखर्जी, डॉ. अक्षयकुमार, डॉ. अनिरुद्ध मुनेश्वर, डॉ. मोहम्मद अली, किशोर भांगे, माधव केंद्रे, सदानंद कदम, फुलकली चिंडालिया, विजू गोहील आणि आकाश भालेराव यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments