HomeनांदेडA.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल...

A.Prataparav Patil Chikhlikar ; आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा येथील रावणाचे दहन

नवीन नांदेड l श्री.बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट जुना कौठा विकास नगर नांदेडचा वतीने तीस फूट उंच असलेल्या दहा तोंडी रावणाचे दहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी हजारो भाविक भक्तांचा उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.

15 व्या ब्रम्होत्सव निमित्ताने 22सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान ब्रम्होत्सव सेवा,भजन संध्या, बालाजी पालखी परिक्रमा,यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजीत करण्यात आले होते विजया दशमी निमित्ताने 02 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रावण दहनआमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नगरसेवक राजू पाटील काळे, नगरसेवक राजू भाऊ गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, विनोद काकडे, राठोड, यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

श्री भगवान बालाजीच्या मुख्य रथ विजया दशमीचा दिवशी दुपारी 3 वाजता मंदीरा पासून मुख्य मार्गावर निघुन जुना कौठा विठ्ठल मंदिर कडुन परत बालाजी मंदिर मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती विविध ठिकाणी परिसरातील महिला भाविक भक्तांनी पुष्पवृष्टी व रांगोळी काढून भव्य स्वागत केले, महाआरती नंतर सायंकाळी 7 ,30 वाजता रावण दहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर माजी आमदार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे नगरसेवक राजे गोरे राजू काळे . जिल्हा परिषद नांदेड चे सदस्य.गंगाप्रसाद काकडे. भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अपर्णाताई चितळे. आर्य वैश्य परिवार मंडळ कवठ्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुक्कावार. कोषाध्यक्ष .सचिन काशेटवार.ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर व अधिकारी पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवराचे स्वागत विश्वस्त समिती पदाधिकारी यांनी केले. संस्थापक अध्यक्ष विजयकुमार पवार, कार्याध्यक्ष उद्धव बसवदे कोषाध्यक्ष उत्तमराव भाले, सचिव बाबाराव इबितवार. जिल्हा परिषद गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव वरपडे .गंगाधर बडवणे, अभय मोरे. बालाजी तमकुटेॲड.गणेश किर्तने, साईप्रसाद वरपडे राजू बुलबुले वेणुगोपाल रांधड डॉ. सुरेंद्र गटांनी भगवानराव पुजारी विनोद सुत्रावे आधी भक्तांनी, व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments