HomeनांदेडMP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता...

MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र आनंदात सुरू आहे. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्सवावर देखील याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी उत्सवाच्या काळात अष्टमीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर वाढोण्याचे कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात उपस्थित होऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतात.

IMG20251001125709 MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन
oplus_0

यंदाही त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माता कालिका मंदिरात उपस्थित होऊन महिषासुर मर्दिनीच्या अवतार शेकडो वर्षापासून उभी असलेल्या नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी बळीराजाला या मोठ्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती दे.. आणि मतदार संघातील सर्वसामान्यांना सुख समृद्धी दे… अशी मनोमन कामांना देखील त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे.

IMG20251001130155 MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन
oplus_0

यावेळी कालिका मंदिरातच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तसेच कालिंका देवीची प्रतिमाही भेट देण्यात आली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मदनराव पाटील, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, संजय काइतवाड, विठ्ठलभाऊ ठाकरे, बाळू अण्णा चवरे, अरविंद पाटील, मनोज पाटील टेम्भिकर, संदीप तुप्तेवार, मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र रामदिनवार, शरद चायला, ज्ञानेश्वर पंदलवाड, आदींसह मोठ्या प्रमाणात मातेचे भक्त, शहर व ग्रामीण भागातील शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

nagesh MP Nagesh Patil Ashtikar : खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतलं माता कालिका देवीचे दर्शन

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments