नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग, मुंबई यांनी नांदेड येथील उच्च शिक्षित, प्रसिद्ध युवा उद्योजक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबईचे नांदेड जिल्हा समन्वयक तथा समुपदेशक असा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून अनेक न्यायप्रविष्ठ व सामाजिक कामे मार्गी लावणाऱ्या तरुण तडफदार बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या माधव संभाजीराव डोम्पले यांची महारष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी “ग्राहक तक्रार निवारण मंच”नांदेड परिमंडळ कार्यक्षेत्रासाठी स्वायत सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
त्यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे सचिव डॉ.राजेंद्र जी.आंबेकर स्वाक्षरीने दिले आहेत.


माधव डोम्पले यांना नियुक्तीबाबत पत्रकारांनी विचारले असता नांदेड परिमंडळातील विज ग्राहकांना दर्जेदार सेवा व न्याय देण्याचे काम करण्याचे भाग्य लाभल्याचे बोलुन दाखविले आहे.त्यांच्या निवडीबद्दल औद्योगिक, व्यावसायिक व घरगुती विज वापर ग्राहक तसेच समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती ,व्यापारी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




