हदगाव, शेख चांदपाशा| प्रसिद्ध श्री दत्त संस्थान, दत्तबर्डी हदगाव येथे श्री एकमुखी दत्तप्रभूंच्या ४१ किलो वजनाच्या, साडेतीन फूट उंचीच्या चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या कार्तिक पौर्णिमा, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे.


सदर मूर्तीसाठी लागणारी चांदी खामगाव येथून खरेदी करण्यात आली आहे. या कार्यात सर्व दत्तभक्तांनी उत्स्फूर्तपणे मदत करून महंत श्री श्री १००८ गोपाळगीर महाराज यांचा संकल्प पूर्णत्वास नेला. ज्यांनी ज्यांनी आर्थिक व अन्य प्रकारे योगदान दिले त्या सर्व भक्तांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

चांदी खरेदी प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये श्री १००८ महंत गोपाळगिर महाराज (दत्तबर्डी संस्थान, हदगाव), श्री १०८ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज (महादेव मठ संस्थान) , श्री सतीशराव देशमुख, शहाजी देशमुख, शिलु देशमुख, युवानेते भास्कर दादा वानखेडे, बबनराव माळोदे, शेषराव पवार धोतरा, सचिन पाटील वाटेगांवकर, अमोल मोरे, अमोल जाधव वाटेगांवकर आदींचा समावेश होता.



