Homeनांदेडflood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

नांदेड| पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी तातडीने बचाव व मदत कार्य हाती घेतले. जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून होमगार्डची एक टिम धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रवाना करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिले.त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व ९ जवान यांची टिम तत्परेने दि २९ रोजी धर्माबाद येथे रवाना झाली. त्या मध्ये प्र. केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्यद इम्रान अली, शेख फेरोज शेख इमाम, माधव कोमटवार, बालाजी गवंडेल, मादास हिवरे, शिवाजी कोकरे, प्रभाकर कोमटवार, पृथ्वीराज कंधारे व हनुमान घोडके यांचा समावेश होता.

IMG 20250901 WA0012 1 flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे तसेच तहसिलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शना खाली होमगार्ड टिम हुनगुंदा, संगम मनूर येथे पाठविण्यात आली. महसूल प्रशासनाकडे ओबीएम मशिनची फायबर बोट होती. सैन्य दलाची टिम देखील तेथे कार्यरत होती.पण बोट चालविणारे प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञ नव्हते. राज्य आपती व्यवस्थान आणि होमगार्ड आपती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले होमगार्ड जवान लगेच सरसावले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठी रिस्क घेत त्यांनी बोट सुरु करून हुनगंदा येथे पुरात अडकलेल्या ६३ नागरिकांना बाहेर काढून बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविले.

IMG 20250901 WA0011 1 flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर

संगम मनूर येथे महादेव मंदिराला पुराने वेढा घातला होता. त्यात मंदिरात महंत यांच्यासह सहा नागरिक आडकून पडले होतो. त्यांना देखील दिलासा देत पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. तहान भूक विसरून होमगार्ड जवान यांनी आपल्या जीवाची बाजी लावत आपले कर्त्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. होमगार्ड दलाच्या या कर्त्तव्यनिष्ठतेबद्दल सर्वत्र कौतूक होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments