HomeनांदेडYeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा...

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

कंधार, सचिन मोरे| सबंध महाराष्ट्रामध्ये सासर कडून सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना आजही नेहमीच घडत असतात. चित्रपटातून देखील सासूला ‘खलनायिका’ दाखवल्याचे पहावयास मिळते. सासू व सुनेच्या नात्यांमध्ये भांडणाची परंपरा तशी जुनीच आहे. सासू व सुनेमध्ये नेहमीच वाद होत असतात. वादाचे रूपांतर अनेक वेळेस हाणामारी मध्ये झाल्याचे ऐकण्यात आहे. या सर्व कटू आठवणी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड व परिवाराने ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लाकडी लक्ष्मीचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी म्हणून पूजन करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गौरी पूजनाचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे.

IMG 20250901 152307 Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!
Oplus_16908288

हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे. सबंध देशांमध्ये घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन केले जाते. १ सप्टेंबर सोमवारी गौरीचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले अनेक ठिकाणी लाकडी, लोखंडी, मडक्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवण्यात येतात. त्यावर मोठ्या प्रमाणात भरमसाठ खर्च देखील करण्यात येतो. या रूढी परंपरा मोडीत काढत लाकडी व लोखंडी लक्ष्म्यांचा त्याग करत आज वर्षा येईलवाड, प्रतिभा येईलवाड व मनीषा येईलवाड या तिन्ही सुनांचे रामचंद्र येईलवाड व कमलबाई येईलवाड यांनी मोठ्या थाटामाटात पूजन केले.

IMG 20250901 WA0008 1 Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

मुलगी व सून हीच खरी आपल्या घरची लक्ष्मी असते ही लक्ष्मी आपला वंश वाढवते त्यांच्या भविष्यातील पुढील पिढी घडवते. आपल्या लेकीमुळे,बहिणींमुळे ज्या घरी आपण कन्यादान करतो ती त्या घरची लक्ष्मी होय. ज्या महिलांचे लक्ष्मीपूजन करून मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मीचे पाऊले पडण्यास सुरुवात होते.

IMG 20250901 WA0009 Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

आज देशांमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे सर्व चुकीचे घडत आहे. समाजातील सर्व कुटुंबांनी जर महिलांचा सन्मान केला त्यांना शिकण्याची समान संधी दिली, मुलींना सक्षम बनविले, मुलींना सामर्थ्य दिले तर कुठल्याच लाकडी लक्ष्मीची पूजा करायची गरज नाही. चालती बोलती लक्ष्मी हीच खरी लक्ष्मी होय. तुमची लक्ष्मी तुमची सून, बहीण,माय आहे. असा संदेश येईलवाड परिवाराने या उपक्रमातून दिला आहे.

यावेळी सुखदेव येईलवाड, पदमीनबाई येईलवाड, प्रा. गंगाधर येईलवाड, संगीताबाई येईलवाड,विनायक येईलवाड, शिवकांता येईलवाड,सुदर्शन येईलवाड, शशिकांत येईलवाड,डॉ. भास्कर येईलवाड, उपसरपंच प्रल्हाद घुमे , सुरेश येवतीकर, नागेश येईलवाड, लक्ष्मण मोरे ,शेख रहेमत यांची प्रमुख उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments