Friday, June 26

Tag: Sacrifice of wooden लक्ष्मी

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

Yeilwad Family ; लाकडी लक्ष्मीचा त्याग ; सुनबाईचे केले गौरीपूजन -येईलवाड परिवाराचा कौतुकास्पद उपक्रम!

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
कंधार, सचिन मोरे| सबंध महाराष्ट्रामध्ये सासर कडून सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना आजही नेहमीच घडत असतात. चित्रपटातून देखील सासूला 'खलनायिका' दाखवल्याचे पहावयास मिळते. सासू व सुनेच्या नात्यांमध्ये भांडणाची परंपरा तशी जुनीच आहे. सासू व सुनेमध्ये नेहमीच वाद होत असतात. वादाचे रूपांतर अनेक वेळेस हाणामारी मध्ये झाल्याचे ऐकण्यात आहे. या सर्व कटू आठवणी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड व परिवाराने ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लाकडी लक्ष्मीचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी म्हणून पूजन करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गौरी पूजनाचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे. सबंध देशांमध्ये घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन ...
error: Content is protected !!