flood situation : पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले बाहेर
नांदेड| पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला होता. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.
जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी तातडीने बचाव व मदत कार्य हाती घेतले. जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून होमगार्डची एक टिम धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रवाना करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिले.त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक, नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व ९ जवान यांची टिम तत्परेने दि २९ रोजी धर्माबाद येथे रवाना झाली. त्या मध्ये प्र. केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्य...
