हिमायतनगर| “प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात भक्तीमार्गाला महत्त्व दिले पाहिजे. साधुसंतांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण जीवन जगलो तर भविष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सांप्रदायिक भक्तीमार्गाने चालत राहावे,” असे प्रतिपादन प्राचार्य मारोती देवकर यांनी केले.


कारला पी. येथील सार्वजनिक गणपती मंडळाच्या वतीने संगीत क्षेत्रातील कलावंत सचिन बोपीलवार यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रा. देवकर म्हणाले की, “संत महंतांच्या विचारांनी व प्रेरणेने आपण वागत राहिलो तर समाजाप्रती आपली भावना वेगळी राहील. हरिनामाचा भक्तीमार्ग धरल्यानेच जीवनाचे कल्याण साध्य होऊ शकते. संतांच्या शिकवणुकीतूनच प्रत्येक व्यक्ती चांगल्या मार्गाने जगू शकते.”

ते पुढे म्हणाले की, “बोपीलवार परिवाराने तीन पिढ्यांपासून सांप्रदायिक वारसा जपला असून, त्यांच्या भक्तीमार्गामुळेच आज त्यांनी यशाचे शिखर गाठले आहे. संतांच्या आशीर्वादामुळे त्यांचे भविष्य उज्वल झाले आहे.”



या कार्यक्रमाला पोलीस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्त अध्यक्ष डॉ. गफार, गणेश मंडळ अध्यक्ष बालाजी मोरे, उपाध्यक्ष शिवाजी गारशटवाड, संजय गोखले, सुनील घोडगे, अशोक आचमवाड, ग्यानबा इटेवाड, विठ्ठल आचमवाड, अशोक बोंपीलवार, शंकर मोरे, कृष्णा बोंपीलवार, वसंत मिराशे, गजानन मिराशे, जनार्दन मुठेवाड, श्रीनिवास बोंबीलवार आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते.


