Thursday, May 14

नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL

नांदेड| नांदेड मध्ये “वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन” मोठ्या उत्साहात संपन्न झाला.हा सोहळा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.

मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नांदेड वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ तथा ज्येष्ठ नागरिक संघटणा फेष्काॅम मुंबईच्या उत्तर मराठवाडा विभागचे संस्थापक अध्यक्ष मा.सुभाषरावजी बार्‍हाळे तर प्रमुख पाहूणे म्हणून महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेस्काॅम मुंबईच्या ज्येष्ठ नागरिक संघ उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे सचिव मा.जयवंत सोमावाड,व कोषाध्यक्ष मा. नारायणराव वाढोणकर,तसेच मा.आनंदरावजी पाटील जवळगावकर, डाॅ.लक्ष्मिताई पुरनशेट्टीवार, श्रीमती प्रभाताई चौधरी,योग शिक्षिका श्रीमती शुश्माताई हुरणे व योग शिक्षिका शुश्माताई सुधाकरराव मेढेकर, शंकरराव, अदिची प्रमुख उपस्थिती होती.

WhatsApp Image 2024 06 16 at 6.36.09 PM नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL
नांदेड शहर व परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी, सदस्य तथा ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वच प्रमुख पाहुण्यांनी चर्चेत भाग घेऊन यथोचित मार्ग दर्शन केले. डाॅ.हंसराज वैद्य म्हणाले की,ज्येष्ठ नागरिक गैरव्यवहार,दुर्व्यवहार,तथा छळ ही बाबच मुळात अत्यंत गैर तथा निंदनीय आहे.हा एक संस्काराचा भाग आहे.आपण प्रत्येकजनच केव्हा तरी ज्येष्ठ नागरिक होणार आहोत याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.ज्येष्ठ नागरिक गैरव्यवहार तथा दुर्व्यवहारच्या मुळ कारणाशी आपण जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की तो आता वृद्ध झाला आहे.शक्तीहिन झाला आहे.तो आता कूठेही काम करण्यासारखा राहिलेला नाही.म्हणून कोणी काम देत नाही व दामही देत नाही.भीक मागता येत नाही कोणी भिक पण घालत नाही.

अर्थात तो आता लक्ष्मीपूत्र राहिला नाही.तो आता अर्थहिन झालेला आहे. तो आता कुटूंबास भार तथा ओझे झालेला आहे. नकैसा झालेला आहे.म्हणून मी आजच्या दिनाचे औचित्त साधून केंद्र व राज्य शासनास अशी विनंती करेन की आता पावसाळी अधिवेशने सुरू होणार आहेत.राज्यात विधान सभा निवडणूका घेतल्या जाणार आहेत.तेव्हा शेजारिल आंध्रप्रदेश,करणाटक व तेलंगाणादि राज्या प्रमाणे गरिब,गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा 3500/-रू मानधन दिल्यास कुटूंबात त्यांचा छळ, प्रतारणा,दुर्व्यवहार तथा गैर व्यवहार त्वरित थांबतील .त्यांचा मान वाढेल.ईज्जत वाढेल.ते उर्वरित जीवन आनंदाने कुटुंबातच जगतील.खर्‍या अर्थाने आजचा दिन साजरा केल्या सारखे होईल!

WhatsApp Image 2024 06 16 at 6.36.10 PM नांदेडमध्ये वैश्विक (जागतिक) वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक दुर्व्यवहार तथा गैरव्यवहार जागृती दिन मोठ्या उत्साहात संपन्न -NNL
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुभाषजी बार्‍हाळे म्हणाले की सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा, अनुभवाचा, त्यागाचा,तथा समर्पणाचा आदर केला गेला पाहिजे! तसेच सर्वांनीच जाणीव पूर्वक माणूस्कीने वागण्याचा प्रयत्न केल्यास वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिक गैरव्यवहार तथा दुर्व्यवहार नक्कीच थांबतील. तद्वतच शासनाने ज्येष्ठांसाठी पारित केलेला 2007चा कायदा,2010चे नियम तथा 2013चा कायदा तंतोतंत जर अंमलात आणला तर ज्येष्ठ नागरिकांना या जाचापासून खात्रीने सुटकारा मिळेल.

राज्य शासनाने राज्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांनां वेग वेगळी वागणूक मिळणार नाही याची काळजी घ्यावी.महाराष्ट्रातील गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांनाही अॅस्काॅन व फेस्काॅमच्या प्रलंबित मागणी प्रमाणे गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना,विधवा मातांना तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मानधनाची तरतूद करावी असे ते म्हणाले. शेवटी नारायणराव वाढोणकरांनी उपस्थितांचे अभार मानले व अध्यक्षांच्या परवाणगीने सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!