छत्रपती संभाजीनगर

Departmental Anti-Corruption Committee ; विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 3 सप्टेंबर रोजी बैठक

छत्रपती संभाजीनगर l विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 3 सप्टेंबर रोजी दुपारी 01.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त (महसूल) यांनी कळविले आहे.

विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी तसेच गाऱ्हाणी समितीकडून ऐकून घेण्यात येत असून लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीज करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात तसेच ठिकाणी होत आहे याबाबत माहिती घेत त्या क्षेत्रातील किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय कार्यपध्दती, नियम व इतर शासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचारास वाव राहू नये व त्यांचे निर्मुलन व्हावे यादृष्टीने सुलभता व पारदर्शकता आणण्याबाबत शिफारस करण्यात येते. सामान्य जनतेच्या प्रशासकीय कार्यपध्दतीबद्दल साशंकता वाटणार नाही व जनतेची कामे सहजगत्या कशी होतील याबाबत समिती मार्फत सबंधितांना सूचनाही बैठकीत देण्यात येतात.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!