Friday, June 26

Tag: Departmental Anti-Corruption Committee meeting on September 3

Departmental Anti-Corruption Committee ; विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 3 सप्टेंबर रोजी बैठक

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर l विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 3 सप्टेंबर रोजी दुपारी 01.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर तथा अध्यक्ष, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव तथा अपर आयुक्त (महसूल) यांनी कळविले आहे. विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता व इतर कारणाने होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी तसेच गाऱ्हाणी समितीकडून ऐकून घेण्यात येत असून लेखी स्वरूपातील तक्रारी स्विकारण्यात येतात. विशिष्ट अभिकथनाबाबत स्वतंत्र्यपणे स्थानिक चौकशी करण्याच्या दृष्टीने तजवीज करण्यात आली आहे. भ्रष्टाचार कोणत्या क्षेत्रात तसेच ठिकाणी होत आहे याबाबत माहिती घेत त्या क्षेत्रातील किंवा त्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मुलनासाठी उपाययोजना केल्या जातात. तसेच प्रशासकीय...
error: Content is protected !!