नांदेड l गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायगांव तहसीलदारांमार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज करण्यात आली.


गत काही दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सूरू असल्याने त्यासह विविध जनसमस्याबाबत नायगांवच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.


नायगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,सरसकट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत तात्काळ जाहीर करा,नदी-नाल्यालगत शेत जमीन खरडून गेली त्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे तसेच,औराळा गावातील स्मशान भूमीचा रस्ता तात्काळ करण्यात यावा, सुजलेगाव ते कोठाळा मुख्य रस्त्याचे राहिलेले काम तात्काळ करण्यात यावे त्याचबरोबर,सुरु असलेल्या अतिवृष्टीत जनतेत आरोग्याच्या समस्या होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी, गावपातळीवर अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक करावे आदी विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.याबाबत तातडीने लक्ष द्यावे अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारु असा इशारा देण्यात आला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प) नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर, राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा. भवरे,तालुका सरचिटणीस किरण वाघमारे,नरसी शहराध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, सय्यद जब्बार व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते,शेतकरी, जनता उपस्थित होते.



