Homeक्राईमकंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून...

कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL

कंधार, सचिन मोरे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात येणाऱ्या मौजे कवठा येथे शनिवारी रामप्रहरी कृषी सेवा केंद्र चालकाच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून धुमाकूळ घातला आहे. त्या चाकू आणि लोखंडी रॉडने पती-पत्नीला जबर मारहाण करून चाळीस तोळे सोन्यासह २२ लाखांची नगदी रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे कंधार तालुक्यातील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसापासून कंधार तालुक्यातील मौजे कौठा परिसरात चोरट्यांनी जनावरे पाण्याच्या मोटारी पळवल्याच्या घटना घडल्या होय. या घटना ताज्या असतानाच शनिवार दि. १५ जुन रोजी रामप्रहरी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून चाळीस तोळे सोन व बावीस लाख रुपये नगदी असा मोठा ऐवज पळवल्याची घटना कंधार पोलीस स्थानकापासून पासून २० कि मी अंतरावर असलेल्या कौठा येथे घडली आहे. कौठा येथे कृषी सेवा केंद्र चालक गजानन येरावार कुटुंबिय पहाटेच्या सुमारास गाढ झोपेत होते. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास गैस कटरने गेट तोडत सहा दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरात शिरले.

IMG 20240615 210841 कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL

सुरुवातीला दोघा पती पत्नीचे मोवाईल फोडून व्यापाऱ्यास धमकावत चाकू रॉडने मारहण केली. दरोडेखोरांनी सदरील कुटुंबावर प्रचंड दहशत निर्माण केली. येरावार यांच्या उजव्या डोळ्यावर चाकूने तर पायावर रॉडने वार करून गंभीर जखमी केले. लहान मुलांना जिय मारण्याची धमकी दिल्याने कुटुंब भयभीत झाले होते. घरात आहे ते घेऊन जा पण मारु नका अशी विनवणी कुटुंब करत होते, मात्र विनंतीचा काही एकउपयोग झाला नाही. या घटनेत दरोडेखोरांनी चाळीस तोळे सोने व २२ लाख रुपयांची रोकड लंपास केली.

दरोडेखोर सीसी कॅमेऱ्यात कैद
कृषी व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकणारे दरोडेखोर तोंडावर रूमाल बांधून आले होते. सोने व नगदी ऐवज लुटीनंतर ते सहा जण पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत गेल्याचे सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. तर १९७२ सालानंतर या गावात हा सर्वात मोठा दरोडा असल्याचे जुन्या जाणकारांनी सांगितले आहे. जिवाच्या भितीने पोलिस कारवाई करण्याची सुध्दा हिमंत कुटुंब दाखवत नव्हते. सदरील दरोड्यामुळे येरावार कुटुंबियासह घटनास्थळाला पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धरणे, प्रभारी पोलिस उपअधिक्षक संकेत गोसावी, कंधार पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन माहिती घेतली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ऱ्यांना पाचारण करून काही सुगावा मिळतो काय..? याचा प्रयत्न पोलिसांनी केला. सदर घटनेप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments