कंधार तालुक्यातील कवठा येथे दरोडेखोरांनी घातला सशस्त्र दरोडा; व्यापारी पती-पत्नीला मारहाण करून ४० तोळे सोने, २२ लाखांची रोकड पळविली -NNL
कंधार, सचिन मोरे। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात येणाऱ्या मौजे कवठा येथे शनिवारी रामप्रहरी कृषी सेवा केंद्र चालकाच्या घरावर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घालून धुमाकूळ घातला आहे. त्या चाकू आणि लोखंडी रॉडने पती-पत्नीला जबर मारहाण करून चाळीस तोळे सोन्यासह २२ लाखांची नगदी रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या दरोड्याच्या घटनेमुळे कंधार तालुक्यातील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसापासून कंधार तालुक्यातील मौजे कौठा परिसरात चोरट्यांनी जनावरे पाण्याच्या मोटारी पळवल्याच्या घटना घडल्या होय. या घटना ताज्या असतानाच शनिवार दि. १५ जुन रोजी रामप्रहरी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडून चाळीस तोळे सोन व बावीस लाख रुपये नगदी असा मोठा ऐवज पळवल्याची घटना कंधार पोलीस स्थानकापासून पासून २० कि मी अंतरावर असलेल्या...
