नवीन नांदेड l नांदेड ते हैदराबाद राज्य महामार्ग लगत असलेल्या नांदेड तालुक्यातील राहेगाव येथील गोदावरी नदीला आलेल्या देवापुर बंधाराचा बाक्य वॉटर मुळे गेल्या दोन दिवसां पासून गावकऱ्यांचा संपर्क तुटल्यामुळे गावातील दैनंदिन शेतकरी वर्ग असलेल्या दुध व फुले विक्रेते यांचे नुकसान झाले असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत बाहेरगावी शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान झाले असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुलाच्यी मागणी झाल्यास दरवेळी पुराचा प्रश्न कायम सोडला जाणार आहे नांदेड महसूल विभागाच्ये मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच या ठिकाणी कार्यरत आहेत.


विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी नदी काठोकाठ भरून वाहत असुन पुर परिस्थिती निर्माण झाल्याने नांदेड हैदराबाद मार्गावर असलेल्या मुख्य रस्त्यावरून पाच किलोमीटर अंतरावरील भायेगाव किक्की राहेगाव मार्गावर असलेल्या राहेगाव येथील देवापूर बंधारा असलेल्या बक वाटर मुळे पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने शेतीच्या व जाण्या येण्याच्या गावकरी यांच्या गेल्या दोन दिवसांपासून संपर्क तुटला असून संभाव्य परिस्थिती सरपंच विलास पाटील इंगळे,यांनी प्रशासनाशी संपर्क साधुन आहेत तर नांदेड तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी बडवणे,तलाठी गौतम पांढरे,ग्रामसेवक भारती, पोलीस पाटील प्रतिनिधी संजय इंगळे व किक्की पोलीस पाटील गोविंद तेलंगे हे पुलाच्या संबंधीत ठिकाणी कार्यरत आहेत.

या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी यांच्यी पुल बांधण्याची मागणी प्रलंबित आहे, हा जर पुल झाला तर दर वेळी होणाऱ्या पुर परिस्थितीतुन गावकऱ्यांची सुटका होणार आहे.पुरपरस्थिती मुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी यांच्या दुध व फुल विक्री व्यवसाय सह शाळेतील जाणाऱ्या येणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.पुरपरिस्थती कायम राहिल्यास प्रशासनाने बोटी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकरी यांनी केली आहे.



