देगलूर, गंगाधर मठवाले| भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औछद साधून देगलूर तालुक्यातील येरगीत पंजाब राज्यातील १०० सरपंच येरगीत दाखल झाले होते. त्यानी गावातील विविध विकास कामाची पाहणी करून पंचायत स्मीता कार्यालयास भेट दिली.


देगलूर तालुक्यातील येरगी गावात आगमन होताच पंजाब सरपंचाचे तिलक स्वागत आरती करून ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने उत्फुर्त स्वागत केले. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीत सादर करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले पंजाब व महाराष्ट्र राज्यातील ससकुरतीचा संगम घडवणारा कार्यक्रम पार पडला. गावात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

येरगी गावात सरपंच संतोष पाटील यांनी चालुक्यकालीन, स्थापत्य व वारसा, स्थळाची पाहणी करून नागरिकाच्या अनुषंगाने चालुक्यीन सपदा आज अस्तित्वात असून, कुठल्याही धरन तलाव पाणीसाठा नदी पाञ जवळ नसताना निसर्गाच्या उपलब्ध सञोताचे सवरधन त्याकाळी केले गेले. ज्याची फळ चाखताना आणि पाणीपुरवठा करिता पाण्याच्या नियोजनात येरगी गाव आजही समरद असल्याचा अनुभव हा पजाबच्या सरपंच पाहुणयानी अनुभवला गावातील स्वछता त्यासाठी ग्रामपंचायत ने घेतलेले परिश्रम शाळेतील अगण बागेचा उपक्रम अंतर्गत रस्ता मजबुतीकरण वारसा जतन याची माहिती सरपंचानी करून दिली.



देशातल्या पहिल्या ग्रामपातळीवरील काॅफी टेबल बुक निर्मिती येरगी गावाने केले आणि यातूनच पंजाब येथील ग्रामपातळीवरील सरपंच येरगी येथे भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली. असे सरपंचानी मनोगतात व्यक्त करताना म्हणाले पंजाब च्या सरपंच भेटीमुळे महाराष्ट्र आणि पंजाब राज्यातील ग्रामपातळीवरील नेतृत्वामध्ये सासकरतीक देवाणघेवाण वारसा जपणुकीचे महत्त्व आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश बळकट झाला. या कार्यक्रमास स्थानिक प्रशासन तसेच ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला असून येरगी गावासोबत नांदेड जिल्हा चे नाव तमाम भारतभर प्रसिद्ध केल्याने, सरपंच संतोष पाटील यांचा नावलौकिक मिळवला आहे.


