नांदेड| एच.एस.आर.पी नंबर प्लेटसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


नांदेड जिल्ह्यातील हाय सिक्युरिटी ( HSRP )नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट होती. चार दिवसांपासून एच एस आर पी पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे साईड सुरळीत चालू नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ऑटोरिक्षासह विविध वाहनांना अजून, नंबर प्लेट बसविण्यात आले नाही.


नांदेड जिल्ह्यातील 68 सेंटर आहेत बरेच वाहन चालकांचे आरटीओ मध्ये आँनलाईन व मोबाईल नंबर नोंद नसल्याने नंबर प्लेट बसविण्यात अडथळे येत असल्याने नंबर प्लेट बसविता आले नाही. हि बाब लक्षात घेता एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्या करिता अजुन दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी.


अशी मागणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड आशिष दरगोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना शेख अहेमद (बाबा) प्रदेशाध्यक्ष टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य, ऑटोरिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती मराठवाडा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र उपाध्यक्ष शेख तयंब, सदस्य शेख अन्सार आदी उपस्थित होते.



