Thursday, May 14

Tag: Extension of deadline

HSRP number plates : एच.एस.आर.पी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ देण्याची टायगर संघटनेची मागणी

HSRP number plates : एच.एस.आर.पी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ देण्याची टायगर संघटनेची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| एच.एस.आर.पी नंबर प्लेटसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हाय सिक्युरिटी ( HSRP )नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट होती. चार दिवसांपासून एच एस आर पी पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे साईड सुरळीत चालू नाही. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील ऑटोरिक्षासह विविध वाहनांना अजून, नंबर प्लेट बसविण्यात आले नाही. नांदेड जिल्ह्यातील 68 सेंटर आहेत बरेच वाहन चालकांचे आरटीओ मध्ये आँनलाईन व मोबाईल नंबर नोंद नसल्याने नंबर प्लेट बसविण्यात अडथळे येत असल्याने नंबर प्लेट बसविता आले नाही. हि बाब लक्षात घेता एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्या करिता अजुन दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड आशिष दरगोडे यांच्याकडे एका निवेदनाद्वा...
soybean purchase registration : सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

soybean purchase registration : सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – पणन मंत्री जयकुमार रावल -NNL

कृषी, मुंबई
मुंबई| राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली. पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, उपसचिव संतोष देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच ६ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी ...
error: Content is protected !!