हिमायतनगर| तालुक्यातील मौजे जवळगाव येथे श्री. शंकरराव पाटील पवार यांच्या शेतातील लिंबाच्या झाडात अनोख्या स्वरूपातील एकदंत गणपती मूर्ती प्रकट झाल्याचे पाहायला मिळाले. आज अंगारिका चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर भाविकांनी मूर्तीचा विधिवत अभिषेक करून आरती केली.


ही घटना पाहण्यासाठी गावकरी तसेच परिसरातील अनेक भक्त जमले होते. निसर्गाच्या या अद्भुत किमयेने सर्वांना थक्क केले असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आज अंगारिका चतुर्थी निमित्त या मूर्तीचा विधीवत अभिषेक व आरती करण्यात आली. भाविकांनी दर्शन घेऊन मनोकामना व्यक्त केल्या. परिसरात “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत शेतकरी श्री पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, दोन तीन दिवसापूर्वी झाडाकडे पाहिल्यावर भास झाला. परंत्तू मी लक्ष दिले नाही, काल परिसरातील इतर शेतकरी व जेष्ठांना दाखविल्यानंतर त्यांनी गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यात दर्शन दिले. त्यामुळे अंगारकी चतुर्थीचा मुहूर्त साधून आम्ही पूजा व आरती केली, गणपती प्रकटल्याची माहिती मिळताच अनेक गावकरी दर्शनासाठी गर्दी करत आहेत असे ते म्हणाले.


