भोकर l दि. 3 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या कालावधीत “अंगदान जीवन संजीवनी ” अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दि. 04 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके सर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण सर यांच्या निरीक्षणाखाली ग्रामीण रुग्णालय भोकर येथे ” अंगदान जीवन संजीवनी अभियान ” कार्यक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात आली. अंगदान अवयव तसेच पोस्टर आणि क्यूआर कोड स्कॅनरचे विमोचन करण्यात आले.



तसेच सर्व शासकीय कार्यालय महाविद्यालय येथे अंगदान जनजागृती साठी क्यूआर कोड स्कॅनरद्वारे अंगदान ऑनलाईन फॉर्म भरण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे फॉर्म भरण्यात आले. यावेळी डॉ. प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी,सर्व अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.




