Tuesday, June 30

Hanegaon ; हाणेगाव ते देगलूर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा

देगलूर, गंगाधर मठवाले|  देगलूर तालुक्यातील मौजे हाणेगाव ते देगलूर येथुन शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व इतर मागण्यासाठी ४ आगस्ट रोजी पदयात्रा चे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांनी केले.

उपजिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघणाऱ्या मोर्चा चे मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पदयात्रा वॄधपकाळाना पेन्शन योजना जाहीर करावे शेतकर्यांना तत्काळ २०१४ चा पिक विमा वाटप करण्यात यावा जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठायाचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावा. देगलूर हाणेगाव देगलूर मानूर देगलूर मूक्रामबाद आदी रस्ता चे काम तत्काळ सुरु करावे.

निराधार वॄधपकाळाना योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात यावे दारिद्र्य रेषेची अथवा २१००० रुपये उत्पन्नाच्या प्रमाण पञाची जाचक अट रद्द करण्यात यावे हाणेगाव येथे राष्ट्रीय बॅक चालू करण्यात यावे आदी मागण्यासाठी पदयात्रा काढण्यात येत आहे पदयात्रा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटीलइं गळे यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येत आहे. तरी शेतकरी शेतमजूर शिवसैनिक वॄध युवा मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन महेश पाटील व बालाजी पाटील इंगळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्राद नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!