Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - District Collector honored in Nagpur : नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात किनवटचा यशस्वी सहभाग – जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर येथे सन्मान
नांदेड करियर नागपूर July 31, 2025

District Collector honored in Nagpur : नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात किनवटचा यशस्वी सहभाग – जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर येथे सन्मान

जिल्हाधिकाऱ्यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने 2 ऑगस्ट रोजी नागपूर येथे सन्मान
NNL TeamBy NNL TeamJuly 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर – जिवती, दुसऱ्या क्रमांकावर वाशीम – मालेगाव, पालघर – जवाहर तर तिसऱ्या क्रमांकावर नांदेड-किनवट, वर्धा – कारंजा, यवतमाळ-पुसद, गडचिरोली-अहेरी, नंदुरबार-अकराणी या आकांक्षित तालुक्यानी स्थान पटकाविला आहे.

समावेशित निर्देशक ‘संपूर्णता अभियाना’चे फोकस क्षेत्र
तालुक्यातील गर्भवती महिलांचे पहिल्या तिमाहीतील नोंदणीचे प्रमाण 100 टक्के करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची उच्च रक्तदाब संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील 30 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींची मधुमेह संदर्भात 100 टक्के तपासणी करणे. तालुक्यातील गर्भवती महिलांना आयसीडीएसच्या पूरक पोषण आहार वितरण कार्यक्रमांतर्गत 100 टक्के पूरक पोषण आहाराचे वितरण करणे. मृदा आरोग्य तपासणी कार्ड 100 टक्के वितरण करणे. तालुक्यातील महिला स्वयं सहायता समूहाना खेळत्या भांडवलाचे 100 टक्के वितरण करणे.

संपूर्णता अभियानात किनवट तालुक्याची कामगिरी
संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून आकांक्षित किनवट तालुक्याने तालुक्यातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी, उच्च रक्तदाबासाठी तपासणी, आयसीडीएस कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी आणि माती नमुना संकलन लक्ष्याविरुद्ध तयार केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी हे 4 निर्देशक 100 टक्के संतृप्त केले आहेत.

संपूर्णता अंतर्गत राबविलेले उपक्रम
महिन्याच्या संपुर्णता अभियान मोहिमेत सदर निर्देशक संतृप्त करण्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी संदर्भात – ग्रामपंचायत निहाय उच्च रक्तदाब-मधुमेह तपासणी शिबिरांचे आयोजन, नियमित आढावा, क्षेत्रभेटी, रिक्त पदांची भरती, जनजागृती इत्यादी उपक्रम घेऊन कामास गती देण्यात आली.

पोषण आहार संदर्भात – पोषण आहारासंदर्भात जनजागृती, पौष्टिक आहार मेळा, पोषण परसबाग निर्मिती, आयसीडीएस शिबीरे, नुक्कड नाटक, जागरूकता रॅली, प्रदर्शने, पोस्टर बनवणे, पोषण ट्रॅकर अँप चे प्रशिक्षण, पोषण पंधरवडा व पोषण महाचे आयोजन, माता दिनाचे नियमित आयोजन, जनजागृती पर विभिन्न स्पर्धाचे आयोजन इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. मृदा आरोग्य पत्रिका संदर्भात – शेतीशाळाद्वारे गावस्तरावर माती तपासणीच्या अनुषंगाने जनजागृती, गावनिहाय शिबिरांचे आयोजन, कृषी मित्रांची मदत, जिल्हास्तरीय लॅबशी सातत्याने पाठपुरावा, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून कॅम्पेन मोड वरती माती नमुने गोळा करणे या माध्यमातून दिलेले 1 हजार 500 चे उद्दिष्ट तीन महिन्यात 100 टक्के पूर्ण करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांचा नीती आयोग व राज्यशासनाच्यावतीने नागपूर येथे सन्मान
या अभियानात तालुक्याने संपूर्णता प्रतिज्ञाद्वारे मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्धारित वचनबद्धता 6 पैकी 4 निर्देशक संतृप्त करून यात उल्लेखनीय प्रगती केल्याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आय आय एम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या समवेत आकांक्षित तालुका किनवटचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस व संबंधित आकांक्षित तालुका फेलो हे राज्यस्तरीय सत्कार समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर संपूर्णता अभियान सन्मान समारोह
संपूर्णता अभियान मोहिमेत योगदान दिलेल्या संबंधित तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना पदक व प्रशस्तीपत्र तर तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित विभागाचे गाव पातळीवर उल्लेखनीय काम केलेल्या कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

District Collector honored in Nagpur in NITI Aayog's Totality Campaign Kinwat's successful participation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleartificial sand : कृत्रिम वाळूचा वापर करण्यासाठी धोरण जाहीर  
Next Article World Breastfeeding Week : जागतिक स्तनपान सप्ताहास शुक्रवारपासून सुरुवात – ‘स्तनपान : एक आरोग्यदायी भविष्य घडवण्यासाठी’
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

The Nanded Rural Police : नांदेड ग्रामीण पोलीसांची कामगीरी मिसींग मधील इसमाचा खुन करणारे केले गजाआड

February 10, 2025

WhatsApp chatbot : 150 दिवसीय ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचा व्हॉट्सअॅप चॅटबॉट कार्यान्वित

December 11, 2025

Dcm Eknath Shinde : समृद्धी महामार्ग प्रमाणे शक्तिपीठ मार्गाचाही विरोध मावळेल : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

February 6, 2025

Children of Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांनी वैद्यकीय क्षेत्रात पेरकेवार समाजाची मान उंचावली

December 31, 2025
Advertisement
टॉप बातम्या

former MLA Madhavrao Patil ; हदगाव–हिमायतनगरचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर : विकासाला राजकीय धार देणारे नेतृत्व

Amarnath | अमरनाथ गुहेतून भाग -७ / लेखक:- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

Cm Devendra Fadanvis ; हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Vir Savarkar’s Ajramar Geet : विर सावरकरांचे अजरामर गित ६१ राष्ट्रभक्तांनी चक्क ३५ हजार फुट ऊंचीवर थेट विमानात गायिले -NNL

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?