District Collector honored in Nagpur : नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानात किनवटचा यशस्वी सहभाग – जिल्हाधिकाऱ्यांना नागपूर येथे सन्मान
नांदेड, अनिल मादसवार| नीती आयोगाच्यावतीने जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने 6 निर्देशकांपैकी 4 निर्देशक 100 टक्के पूर्ण केल्यामुळे राज्यातुन तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. याबद्दल राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा आयआयएम नागपूर येथे 2 ऑगस्ट 2025 रोजी पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आले. देशभरातील 500 तालुके यात सहभागी झाले. या अभियानात आरोग्य, पोषण, कृषी आणि सामाजिक विकास या क्षेत्रांतर्गत 6 निर्देशकांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्णता अभियानात राज्यातील 27 आकांक्षित तालुक्यानी सहभाग घेतला होता. यात पहिल्या क्रमांकावर चंद्रपूर -...
