नांदेड l मुखेड तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे क्लर्क गिरी हे दिव्यांगांना त्रास देत असून त्यांचे संपूर्ण मानधन वाटप न करता तीन हजार, दोन हजार रुपये, त्यांच्या खात्यामध्ये टाकून उर्वरित रक्कमेची हेराफेरी करत आहेत.


चौकशी केली असता उद्धट बोलून तक्रारदारांना शिवीगाळ करत आहेत. कार्यालयीन वेळेत नेहमी गैरहजर राहत आहेत याबाबत संबंधित तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती परंतु त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही उलट गिरी यांना त्याच ठिकाणी ठेवून एक प्रकारचे पाठबळ दिले आहे.


याबाबत जिल्हाधिकारी यांनी संजय गांधी निराधार विभागातील गिरी यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी निवेदन देऊन भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीचे तालुका अध्यक्ष देविदास बद्देवाड, परमेश्वर शेटवाड आणि कार्तिक कुमार भरतीपुरम आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. त्वरित चौकशी करून निलंबित करावे अन्यथा आपल्या कार्यालयापुढे आमरण उपोषण करणार असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.









