Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज
नांदेड धार्मिक July 27, 2025

Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज

भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणात रंग भरला
NNL TeamBy NNL TeamJuly 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| मृत्यूपूर्वी जर चित्त भगवंतात स्थिर असेल, तर आत्म्याला पुढील जन्माची आवश्यकता राहत नाही. गंगेचा जल, रामाचे नाम, संतसंग, आणि भगवंताचे चरणस्मरण हे जीवनाच्या शेवटी मुक्तीचे द्वार उघडतात. श्रीमद भागवत कथा (Shrimad Bhagwat Katha) हा ग्रंथ केवळ एक धार्मिक पुस्तक नाही, तो मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास सांगतो. श्रीमद भागवत म्हणते “मानवाचा खरा धर्म तोच की, जो भगवंतावर निःस्वार्थ भक्ती निर्माण करतो आणि ज्यामुळं आत्मा आनंदित होतो.” “प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार प्रत्येक गोष्ट आधीच लिहून ठेवलेली आहे” ही कल्पना भारतीय संस्कृतीत ‘प्रारब्ध’, ‘कर्म’ आणि ‘दैव’ या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. असे विचार हभप.सारंग चैतन्यजी महाराज (Habap.Sarang Chaitanyaji Maharaj) यांनी मांडले.

वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरात श्रीमद भागवत महापुराण कथेला दिनांक २७ रविवारपासून सुरुवात झाली. भागवताचार्य परमपूज्य विदर्भ केशव स्वामी सारंग चैतन्यजी महाराज यांच्या मधुर वाणीने भाविक भक्त मंत्रमुग्ध होत असून, पवित्र श्रावण मासातील पहिल्या कथेचा पहिला दिवस आनंदी आनंदात गेला. सात दिवसीय महापुराण कथेच्या उद्घाटन प्रसंगी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अध्यात्मिक वातावरणात रंग भरल्याचे दिसून आले. सारंग चैतन्यजी महाराज यांच्या श्रीमुखातून कथामृताची गंगा वाहू लागली आहे.

पहिल्या दिवशी सारंग चैतन्यजी महाराजांनी श्रीमद भागवताची महिमा, व्यासपिठाचे महत्त्व आणि धर्म, भक्ती, वैराग्य यांची सुरुवातीची रूपरेषा भाविकांसमोर मांडली. “जेव्हा मनात भक्ती असते, तेव्हा श्रीकृष्ण स्वतः पावन होण्यासाठी त्या भक्ताकडे येतो”, असे उद्गार महाराजांनी कीर्तनात काढले. साधूचे दोन प्रकार एक दुसऱ्याचं सध्या करणारे व दुसरा स्वतःच साधून घेणारे हे सांगत असताना “अवघाची संसार सुखाचा करीन” ही ओवी अत्यंत खोल आणि समर्पित भक्तीभाव व्यक्त करणारी आहे. भक्ती ही फक्त ध्यानधारणा किंवा मंदिरे यापुरती मर्यादित नाही, तर ती आपल्या संपूर्ण जीवनशैलीत असावी. सारंग चैतन्यजी महाराजांच्या कीर्तनात हि ओवी अनेकदा येते. कारण महाराज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात संतांची शिकवण रुजवण्याचे महत्त्व सांगतात.”भक्ती ही माणसाला फक्त वैराग्य शिकवत नाही, तर त्याचं जीवनही सुंदर बनवतं.”

श्रीमद भागवत कथा सप्ताह म्हणजेच सात दिवसांत सांगितली जाते यामागे काही धार्मिक, अध्यात्मिक आणि व्यावहारिक कारणे आहेत. भगवंताच्या लीलांचा, भक्तीचा आणि तत्वज्ञानाचा मंगलमय, पवित्र ग्रंथ म्हणजेच श्रीमद भागवत असून, श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले गीतेचे दिव्य ज्ञान आहे. “भागवत सप्ताह” म्हणजे शुकदेव ऋषींनी राजा परिक्षित यांना मृत्यूपूर्वी केवळ ७ दिवस शिल्लक असताना श्रीमद भागवत कथा सांगितली. त्या ७ दिवसांत परिक्षिताने सर्व काही सोडून केवळ भागवत कथेचे श्रवण केले आणि मोक्षप्राप्ती केली. हीच परंपरा पुढे “भागवत सप्ताह” या स्वरूपात चालू झाली असल्याचे स्वामीजी म्हणाले.

राजा परीक्षित (शिष्य) आणि श्री शुकदेवजी महाराज (गुरु) यांचा प्रश्नोत्तर रूपी संवाद

गुरूशिवाय भगवंताचा अनुभवही अशक्य आहे, कारण गुरूच आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो. सद्गुरूंचे सानिध्य असले तर जीवनाचा खरा अर्थ कळतो. देव खराच आहे तो रूपात (सगुण) आणि रूपविरहित (निर्गुण) दोन्ही रूपात आहे. “देव दिसत नाही, म्हणून खोटा असावा का?” पण वायू, प्रेम, विचारसुद्धा दिसत नाहीत तरी त्यांचं अस्तित्व मानतोच ना? देव हा अनुभवायचा विषय आहे, बघायचा नाही. श्रीमद भागवत कथा ग्रंथाचा मूळ आधार आहे राजा परीक्षित (शिष्य) आणि श्री शुकदेवजी महाराज (गुरु) यांचा प्रश्नोत्तर रूपी संवाद म्हणजेच भागवत आहे असेही स्वामीजी म्हणाले.

“अज्ञानरूपी पट्टी दूर करण्यासाठी तो जन्माला आला” हे वाक्य भगवंताच्या, संताच्या, किंवा सद्गुरूच्या अवताराचे खरे कारण सांगते. लौकिक म्हणजे “लोकाशी संबंधित”, अलौकिक म्हणजे “लोकांपलीकडचं”, म्हणजेच प्रेम हे लौकिक असू शकतं, पण भक्तीमय प्रेम राधेचं श्रीकृष्णावरचं प्रेम – अलौकिक असतं. “लौकिकात जगता जगता, अलौकिकाचे स्मरण ठेवले, तरच जीवन सार्थक ठरते.” भागवताला “अमर कथा” म्हंटले आहे. भागवत ही कथा भगवंताच्या लीला, भक्तांचे चरित्र, आणि आत्मज्ञान सांगते हे ज्ञान कधीही जुनं होत नाही असे संगत स्वामीजींनी पहिल्या दिवशीची कथा समाप्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भक्तांनी उपस्थिती लावली होती.

"Shrimad Bhagwat Katha" The spiritual journey of the entire life Habap.Sarang Chaitanyaji Maharaj of a human being from birth to salvation
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMaratha activists : वज्रमुठ राज्यव्यापी बैठकीत रोषाचा स्फोट, मराठा कार्यकर्त्यांवरील अन्यायाला तीव्र निषेध
Next Article preventive measures : पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे होणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Tere Sur Aur Mere Geet : “तेरे सुर और मेरे गीत” कार्यक्रमाचा रसिकांनी लुटला मनमुराद आनंद

October 11, 2025

Chief Minister’s War Room : मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

September 23, 2024

Assets worth Rs 52 crore seized in last 24 hours : गेल्या २४ तासात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त -NNL

October 24, 2024

Zilla Parishad School.; जिल्हा परिषद शाळेची. शालेय व्यवस्थापन समिती जाहीर अध्यक्षपदी धनंजय घोरबांड तर उपाध्यक्ष राम मोरे – NNL

December 10, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Rice truck overturns : फुलवळ टोलनाक्यावर तांदूळाचा ट्रॅक पलटी! उलट सुलट चर्चेला उधाण

Selected Bsf : सीमेवर देशरक्षणाची शपथ; घिसडी समाजातील युवकाची बीएसएफमध्ये निवड

first fast : सफुरा शेख उबेदुल्ला हिने केला पहिला रोजा पूर्ण

Shyam Patil Vadje : सामाजिक उपक्रम राबवत मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

Method and features of Tulsi marriage celebration : तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?