District Health Officer : कंधार, लोहा तालुक्यात भर पावसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या गावांना भेटी

नांदेड| जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड डॉ संगीता देशमुख हे आज दि. 26 जुलै रोजी भर पावसात ग्रामीण भागात दौरा कंधार व लोहा तालुक्यातील गोलेगाव व सावळेश्वर गावास भेट देऊन पावसाळ्यात होणाऱ्या साथरोगाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी गावातील पाणीपुरवठा, डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनिया, किटकजन्य आजार, आहार व स्वच्छता या बाबत ग्रामपंचायत कार्यालय व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्या कामाची तपासणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या सोबतच त्यांनी गोलेगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू, चिकुनगुनिया, पावसाळ्यात योग्य आहार व किटक जन्य आजार याबाबत आरोग्य शिक्षण दिले.

यावेळी त्यांच्या सोबत डॉ केंद्रेकर तालुका आरोग्य अधिकारी कंधार, डॉ.लोने वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्माननगर, डॉ संदिप शिंगारे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र पेनूर, संजय भोसले जिल्हास्तरीय आरोग्य पर्यवेक्षक व सर्व अधिकारी,आरोग्य कर्मचारी व आरोग्य सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button