हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव पोलीस स्टेशन अतर्गत जवळपास 50 गावापेक्षा जास्त गावांच्या कायदा आणि सुरक्षेचा भार आहे. या गावातील नागरिकांना आपल्या समस्या असतील तर पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ठाण्यात लैंडलाइन फोन आहे. मात्र तो अनेक महीन्या पासून बंद स्थितीत आहे.


यासंदर्भात अनेक तक्रार असल्याने ठाण्यात मोबाइल क्रमांक तरी सार्वजनिक ठेवण्यात यावा अशी मागणी होतांना दिसून येत आहे. आपत्कालीन स्थितीत पोलिसांशी संपर्क कसा साधावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या बाबत माहीती घेतली असता हदगांव पोलीस स्टेशनच नव्हे तर तालुक्यातील एक आऊट पोलीस स्टेशन दोन पोलीस स्टेशनचे फोन बंद असल्याचे माहिती मिळाली.

📞 पर्यायी संपर्क व उपाय: जिल्हा पोलिस नियंत्रण कक्ष (Control Room)
नांदेड जिल्हा नियंत्रण कक्षाचा संपर्क करा:
📞 100 किंवा 112 (सर्वत्र कार्यरत)


पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड
अधिकृत वेबसाइटवरून किंवा Google वरून “SP Office Nanded Contact Number” शोधून संपर्क साधा.
स्थानिक सोशल मीडिया हँडल्स – नांदेड पोलीस किंवा हदगाव पोलीस स्टेशन यांचे Facebook / Twitter पेजेसवरून तातडीची माहिती मिळू शकते.
प्रत्यक्ष ठाण्यात भेट देणे – तातडीचे प्रकरण असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष जाऊन माहिती देणे अधिक प्रभावी ठरते.


