HomeनांदेडCanceled : विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द

Canceled : विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द

नांदेड| विजयवाडा विभागातील लाईन ब्लॉकमुळे पुढील गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात येत आहेत. यात आदिलाबाद – तिरुपती – आदिलाबाद एक्स्प्रेस आणि जालना – तिरुपती – जालना विशेष एक्स्प्रेस गाडीचा समावेष आहे.

विजयवाडा विभागातील गुडूर ते विजयवाडा सेक्शन मधील पेद्दावादैपुडी – दुग्गीराला – तेनाली – सुन्दुरू स्थानकांदरम्यान तिसरी रेल्वे लाईन सुरु करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, या लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्यांच्या परिचालनावार परिणाम झाला आहे. तो पुढील प्रमाणे :-

रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
1. गाडी क्रमांक 17405 तिरुपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस दिनांक 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट, 2025 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 17406 आदिलाबाद ते तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस दिनांक 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट, 2025 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
3. गाडी क्रमांक 07609 जालना ते तिरुपती विशेष एक्स्प्रेस दिनांक 18 ऑगस्ट, 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.
4. गाडी क्रमांक 07610 तिरुपती ते जालना विशेष एक्स्प्रेस दिनांक 19 ऑगस्ट, 2025 रोजी रद्द करण्यात आली आहे.

उशिरा धावणारी गाडी :
1. गाडी क्रमांक 17406 आदिलाबाद ते तिरुपती कृष्णा एक्स्प्रेस दिनांक 08, 10, 12 आणि 13 ऑगस्ट रोजी 120 मिनिटे उशिरा धावेल.

🚧 महत्त्वाची रेल्वे सूचना 🚧
🚆 आदिलाबाद – तिरुपती – आदिलाबाद एक्स्प्रेस
🚆 जालना – तिरुपती – जालना विशेष एक्स्प्रेस
📅 प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासूनच नियोजन करावे.
👉 संबंधित रेल्वे स्थानकांवर किंवा IRCTC वेबसाईटवर अद्ययावत माहिती मिळवता येईल.
🙏 झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन आपली क्षमा मागते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments