Tuesday, June 30

Nanded ; नांदेड तहसील येथे आयोजित लोकशाही दिनात नावामनापाशी निगडित तक्रारी चे निवारण

नांदेड l नांदेड तहसील कार्यालय येथे आयोजित लोकशाही दिनात नावा मनपाच्या निगडित असलेल्या तक्रारीचे निवारण नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी केला असुन नांदेड तहसील येथे लोकशाही दीनाचे आयोजन करण्यात आले होते.

21.07.2025 रोजी सकाळी 11.00 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे संजय वारकड, तहसिलदार नांदेड यांचे अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय लोकशाही दिन बैठक आयोजित करण्यात आली. आज झालेल्या बैठकीत एक प्रकरण प्राप्त झाले. सदरचे प्रकरण महानगरपालिका कार्यालयाशी संबंधित असल्याने तात्काळ महानगरपालिका कार्यालय यांचेकडे वर्ग करण्यात आले.

प्राप्त प्रकरणात संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही केल्याने आणि अर्जदाराचे समाधान झाल्याने प्रकऱण निकाली काढण्यात आले. आज झालेल्या बैठकीत पंचायत समिती, कृषि विभाग, निवडणूक विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, दुय्यम निबंधक, महिला व बाल विकास विभाग, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका भुमि अभिलेख इ. कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रत्येक महिन्याचे तिसऱ्या सोमवारी तहसिल कार्यालय नांदेड येथे तालुकास्तरीय लोकशाही दिन नियमितपणे आयोजित कऱण्यात येते. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, 15 दिवस अगोदर विहीत नमुन्यात अर्ज देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!