
नांदेड| ठाकरे शिवसेनेचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नांदेड येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत सोबत बैठक घेतली. त्या बैठकीत मतदार संघातील समस्या बाबत त्यांनी चर्चा केली. शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगाने शेतकऱ्याला सोबत घेत नितीन गडकरी यांची भेट घेऊन मार्ग अशी प्रतिक्रिया खासदार आष्टीकरांनी दिली आहे.


नांदेड महानगरपालिका प्राधिकरण बोलतांना ते म्हणाले की नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे मात्र अशोक चव्हाण का विरोध करतात हे मला माहित नाही, नांदेडमध्ये प्राधिकरणासाठी राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आग्रही असताना आता ठाकरे शिवसेनेच्या खासदारांनी प्राधिकरणाच्या बाजूने आपली भूमिका मांडली आहे.


महावितरण बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली
– खेड्यापाड्यात अनेक मार्गदर्शनाच्या समस्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांची भेट घेतली.
– केंद्राने राज्य शासनाचे अनेक प्रकल्प चालू आहेत मात्र ते पूर्णत्वास जात नाहीत याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
– महावितरण मुळे अनेक शेतकऱ्यांची ऊस जळाली काही जनावर दगावले त्यासंदर्भात बोललो.
शक्तिपीठ महामार्ग संबंधी आता संसदेच्या अधिवेशनात मुद्दा मांडणार आहे, शेतकरी घेऊन दिल्लीला जाणार आहे गडकरी साहेबांची भेट घेऊन मार्ग काढणार आहोत असे त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार असणं, आम्ही शिवसैनिक आहे केव्हाही तयार असतो, आमची सगळी तयारी आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविणार पण अडचण आली तर स्वतंत्र्य लढविण्यासाठी तयार असल्याचे ते म्हणाले.


नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे, विकासाचा दृष्टिकोन अजून समोरील येईल. प्राधिकरण व्हायला काहि अडचण नाही मात्र नेमकं कशामुळे यात अडथळे येताहेत मी स्वतः लक्ष घातलं नाही. हळद संशोधन करण्यासाठी हेमंत पाटलांनी आग्रह धरला पाहिजे फक्त शंभर कोटी घेऊन जमणार नाही, पुढे निधी आला पाहिजे असेही ते म्हणाले.




