HomeनांदेडNanded News : नांदेड तालुक्यातील दक्षिण मतदारसंघात नव्याने धनेगाव जिल्हा परिषद संघाची...

Nanded News : नांदेड तालुक्यातील दक्षिण मतदारसंघात नव्याने धनेगाव जिल्हा परिषद संघाची निर्मिती,दहा गावाच्या समावेश

नवीन नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या नवीन मतदार संघ नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील धनेगाव हा झाला असुन वाजेगाव‌ मतदार संघातुन विभाजन करून धनेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ अस्तित्वात आला आहे यामुळे दक्षिण विधानसभा मतदार संघात आता तिनं जिल्हा परिषद संघ व सहा पंचायत समिती गण झाले आहेत, नव्याने झालेल्या जिल्हा परिषद मतदार संघाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व सरपंच, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी व संभाव्य उमेदवार यांनी प्रशासनाचे आभार मानुन आनंद व्यक्त केला असुन विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तर वाजेगाव सर्कल मध्ये ऊतर मतदार संघातील पाच गावांचा समावेश असल्याची प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे.

राज्य शासनाच्या निवडणूक विभागाने वाढलेल्या लोकसंख्या अधारे जिल्हा परिषद नांदेड यांच्यी पुर्वी असलेली जिल्हा परिषद गट संख्या 63 वरून दोन जिल्हा परिषद गट वाढवून 65 केली आहे,यात नांदेड तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदार संघातील नव्याने धनेगाव जिल्हा परिषद मतदार संघाच्या समावेश आहे तर अर्धापूर तालुक्यातील एक मतदार संघ वाढला आहे आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक अनुषंगाने निवडणूक विभागाने प्रारूप मतदार संघातील जिल्हा परिषद गट प्रसिद्ध केले यात या नव्या दोन गटांचा समावेश केला आहे ,प्रारूप यादी प्रसिद्ध नंतर नव्याने होणाऱ्या जिल्हा परिषद धनेगाव मतदार संघातील या मतदारसंघात धनेगाव, मुझामपेठ, फतेपुर, ईलीचपुर, पिंपळगाव मिश्री, वडगाव, तुप्पा, काकांडी तर्फे तुप्पा,राहेगाव,भायेगाव,किक्की,बाभुळगाव हेमलतांडा जयसिंग तांडा यांच्या समावेश आहे.

नव्याने झालेल्या मतदार संघाबाबत वाजेगाव माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी लोकसंख्या वाढीवर वाजेगाव मतदार संघातील विभाजन करून नव्याने धनेगाव जिल्हा परिषद मतदार संघ केल्या बद्दल प्रशासनाचे आभार मानले तर भाजपा विधानसभा दक्षिण प्रमुख बालाजी पाटील पुणेगावकर यांनी नव्याने झालेल्या मतदारसंघा मुळे विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर शिवसेना शिंदे गटाचे विघमान भायेगाव सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी नव्याने झालेल्या मतदारसंघाचे अभिनंदन करून विकासाला चालना मिळेल तर कांकाडी माजी सरपंच सुदीन बागल यांनी या मतदार संघा मुळे एकत्र गावे आल्याने विकासाला चालना मिळेल तर सरपंच प्रतिनिधी तथा शिवसेना ऊबाठा गटांचे विधानसभा प्रमुख हणमंत भवर पाटील यांनी नव्याने झालेल्या धनेगाव मतदार संघातील अनेक गावांत विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

विभाजन होऊन नवीन होत असलेल्या जिल्हा परिषद मतदार संघात गावे कमी झाल्याने शासनाच्या विविध योजना सह विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया धनेगाव ग्रामपंचायत सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटु पाटील शिंदे, यांनी तर गंगाधर कवाळे,भाजपा दक्षिण मंडळ ग्रामीण अध्यक्ष विश्वंभर शिंदे,तुप्याचे माजी ऊपसरपंच बबनराव कदम यांच्या सह अनेकांनी व्यक्त केला‌ आहे,वाजेगाव जिल्हा परिषद मतदार संघात नव्याने पाच गावांसह एकुण आठरा गावे तर बळीरामपुर मध्ये 14 गावे आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments